खैरणे एमआयडीसीत प्रिंटिंग युनिटला आग

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
ठाणे बेलापूरमार्गावरील खैरणे एमआयडीसी टीसीसी इंडस्ट्रियल एरिया, डब्ल्यू-230 येथे असलेल्या सिद्धकला प्रिंट मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशनस् प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रिंटिंग युनिटला सोमवार (दि.21) जून रोजी आग लागल्याची घटना घडली.

या आगीत युनिटमधील सर्व मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात लाखोंचे नुकसान झाले. आगीची घटना कळतच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने युनिट बंद असल्याने या दुर्घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत असून आग कशी लागली ? याचे कारण मात्र समजू शकले नाही.

Exit mobile version