| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर रेल्वे स्थानकाच्या समोर एका चायनीजच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. या दुकानाचे शटर उघडून शोरमा मशीनमध्ये पेटलेला एलपीजी गॅस सिलेंडर बाहेर काढून त्याची आग विझवून इतर वस्तूंना लागलेली आग देखील पूर्णपणे विझविण्यात आली. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी सौरभ पाटील, अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, यंत्रचालक आर.एल. बंडा, फायरमन संभाजी पाटील, गणेश भोईर, एन.जे. मढवी व बी.व्ही. भोसले आदींनी आगीवर नियंत्रण मिळवीत दुकानामधून 2 भरलेले व 2 रिकामे असे एकूण 4 एलपीजी सिलेंडर बाहेर काढले आणि ही आग पूर्णपणे विझवली.






