| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील आकुर्ली आणि कळंबोलीमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या आगींवर नियंत्र मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पहिली घटना पनवेलमधील ग्रामीण भागात आकुर्ली फाटा येथे घडली. आकुर्ली फाटा येथील डोंगरावरच्या वृक्षांना तसेच कळंबोली वसाहतीमधील सिडको कार्यालया शेजारील झोपड्यांना आग लागली. दोन्ही आगींवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. आकुर्ली येथील डोंगराला लागलेल्या आगीच्या घटनेत हजारो वृक्ष होरपळले. उशीरापर्यंत डोंगरावरील आगीवर पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाचे सुरू होते. सायंकाळी कळंबोलीतील सिडको कार्यालयाशेजारील झोपड्यांना आग लागली. या आगीत शेकडो झोपड्या खाक झाल्या. काही मिनिटांत कळंबोली येथील अग्निशमन दलाच्या बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले.
पनवेलमध्ये दोन ठिकाणी आगीमुळे नुकसान
