शॉर्टसर्किटमुळे दुकान भस्मसात

। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली एलआयजी 1, सेक्टर 3 मधील दुचाकी दुरूस्तीचे दुकाना शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत भस्मसात झाले आहे. या घटनेत हजारोंचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही.
विश्‍वसनीय सुत्रांनुसार, एलआयजी वसातहीमधील तळमजल्यावर असणार्‍या दुचाकी दुरुस्तीच्या दुकानात शॉर्टसक्रिट झाल्याने, दुकानातील प्लॅस्टिक रबरच्या वस्तूने पेट घेतला. काही वेळात आगीचे लोट शटर बंद असलेल्या दुकानाच्या बाहेर येऊ लागल्याने, घटना समोर आली. परिसातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत वसाहतीतील रहिवाशांना तेथून बाहेर काढले. तसेच अग्नीशामक दलाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले.

Exit mobile version