| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिकमधील सातपूर भागातील एका कंपनीत शक्रवारी (दि.20) मोठी आग लागली. आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या घटनेत कोणी जखमी झालंय किंवा जिवितीहानीबद्दलही माहिती समोर आलेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातपूर औद्योगिक वसातहीत ज्योतिष स्ट्रक्चर कंपनी आहे. या कंपनीत प्लास्टिक टाकीला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केलं. आगीचा भडका उडाल्यानंतर धुराचे लोट परिसरात पसरले. आग लागल्याची माहिती समजतचात अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, आगीची घटना घडताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केलीय. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. सहा अग्निशमन बंबांच्या मदतीने अर्धा ते पाऊण तासात अग्निशमन दलाने पूर्णपणे आटोक्यात आणली.