। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईच्या लालबाग परिसरातही आग लागल्याची घटना गुरुवारी (दि. 19) घडली. लालबाग काळाचौकी परिसरातील गटारात आग लागल्यामुळे एक दुचाकी गाडी जळून खाक झाली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगर गॅसची पाईपलाईन या ठिकाणाहून जाते, त्यामुळे आग लागल्याचा संशय आहे. पण आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अग्निशमन दल आणि मुंबई मनपा आगीचे नेमके कारण शोधत आहे.







