पाणी योजनेचे पाईप जळून खाक
| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यात रविवारी देवन्हावे परिसरात एकाच वेळेस तीन ठिकाणी वणवा लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. गावकर्यांची ही आग आटोक्यात धावपळ उडाली मात्र या आगीच्या भक्ष्यस्थानी गावाच्या पाणी योजनेसाठी मोकळ्या जागेत ठेवलेले महागडे पाईप जळून खाक झाले.आग विजविण्यासाठी अग्निशमक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले त्यामुळे तब्बल चार तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला असणार्या गवताला आग लावल्याने आगीचा भडका वाढतच गेल्याने ग्रामस्थांची सुरू झाली. आगीच्या भक्ष्यस्थानी देवन्हावे ग्राम पंचयतीच्या पाणी योजने साठी आणलेले महागडे पाईप एक मोकळ्या जागेत ठेवले असताना या आगीची झळ त्या पाईपाना लागल्याने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचा भडका वाढताच असल्याने खोपोली अग्निशमक,टाटा स्टील ,जे एस डब्ल्यू, फिगोरी आलाना कंपनी च्या फायरब्रिगेट ची दाखल झाली होती अन्य यंत्रणा अपघात ग्रस्त टीम देवन्हावे गावातील शेकडो नागरिक यांच्या अथक परिश्रमा नंतर तब्बल चारतासा नंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले त्यानंतर ग्रामस्थानी सुटकेचा श्वास सोडला मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात वृक्षही जळून गेली आणि मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.