| उल्हासनगर | प्रतिनिधी |
पहाटेच्या सुमारास एका रिक्षाचालकाच्या घरावर फायरिंग करण्यात आल्याची घटना उल्हासनगरातील विट्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. प्रमोद भोईर हे रिक्षाचालक माणेरे गावात वास्तव्याला आहेत.
रवीवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या घराबाहेर येऊन अतिशय जवळून घराचा दरवाजा आणि खिडकीवर दोन राऊंड गोळ्या फायर केल्या.फायरिंगच्या आवाजाने घाबरून प्रमोद भोईर व त्यांचे कुटुंब जागी झाले. सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी टीम सोबत घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दुचाकीवरून आलेला हा हल्लेखोर भोईर यांच्या घराकडे येताना सीसीटीव्हीत कैद झाला असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.