| महाड | प्रतिनिधी |
काल रात्री (दि.12) महाड तालुक्यातील मोहोत येथे शुल्लक कारणाच्या वादावरून एकाने फायरिंग केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये सोहम आत्माराम हिरडेकर (23) रा. भीवघर व संकेश शशिकांत कदम (28) रा. भीवघर अशी जखमी झालेले दोघांची नावे आहेत. त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले असून एकाच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे त्याला अधिक उपचार करीता मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. यामध्ये रोशन राम मोरे रा. मोहोत पाटीलवाडी असे फायरिंग करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी बंदूक देखील हस्तगत केली आहे.
महाड तालुक्यातील मोहोत येथे मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम असताना मागील भांडणाचा राग मनात धरून हा गोळीबार झाल्याचे समजते. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करीत आहेत.