| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील नागोशी गावामध्ये बांधकाम साईडवर बांधकाम ठेक्याच्या वादातून एकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बाबू वाघमारे असल्याचे वृत्त हाती आले आहे. गोळीबार करणारा आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नानोशी येथे घर बांधण्याच्या कामाचा ठेका घेण्याचा वाद बुधवारी (दि.26) उफाळून आला. घर बांधण्याच्या साईडवर 45 वर्षीय बाबू वाघमारे काम करीत होता. त्याच्याबरोबर एकाचा कामाच्या ठेक्यावरुन वाद झाला. वाद विकोपाला पोहोचून त्याने बाबू वाघमारे वर बंदूक रोखून थेट गोळीबार केला. या गोळीबारात बाबू वाघमारे यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलीसांनी सांगितले.