। खोपोली । वार्ताहर ।
महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी मदत करणार्या पळस्पे आणि बोरघाट पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, रस्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, टोल प्लाझा मधले आय. आर. बी. चे कर्मचारी व महामार्गावर दुरुस्ती काम करणार्या कामगाराना रेसिलियेंट फाऊंडेशनच्या माध्यमातून गोल्डन अवर मध्ये उपचार आणि बचाव कार्य संबंधीचे धडे भूपेंद्र मिश्रा यांनी दिले.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी वाहतूक पोलिस यंत्रणेच्या पळस्पे आणि बोरघाट विभागाचे निरीक्षक वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, शेवळे, भोसले, पोलीस उपनिरीक्षक लांगी मोरे चव्हाण आणि शिंदे तसेच अपघाग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, अमोल कदम, हनीफ कर्जीकर, अमोल ठकेकर उपस्थित होते.