आरोग्यदायी योजनेतून रुग्णाला मिळाला आधार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात सुरू झालेल्या पहिल्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पहिली हृदयविकार शस्त्रक्रिया यशस्वी झाली. रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये जनतेसाठी शासनाच्या सर्व योजना अंतर्भूत असून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तेथील तज्ञ डॉक्टर यांच्याकडून सुरू आहेत. दरम्यान, महात्मा फुले आरोग्य योजनेमधून हृदयविकराच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला मोठा आर्थिक आधार मिळाला असून पहिल्या मोठ्या शस्त्रक्रियेने रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोठा आधार समजला जात आहे.
तालुक्यातील उकरुळ गावातील 68 वर्षीय अच्युत गावडे हे 24 सप्टेंबर रोजी छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी रायगड हॉस्पिटलमधील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. संजय तारळेकर आणि डॉ. अमोल सातव यांनी गावडे यांच्या हृदयात असलेले ब्लॉकेज यांची माहिती रुग्णाला दिली आणि धीर देत याच ठिकाणी शस्त्रक्रिया करता येईल असे सांगितले. त्यावर एवढे वय असून देखील गावडे यांनी रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टर यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनतर डॉ तारळेकर आणि डॉ चव्हाण यांनी आपल्या सहकारी तंत्रज्ञ यांना सोबत घेत अच्युत गावडे या रुग्णांवर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया तब्बल 45 मिनिटे चालल्यानंतर शरीरातील दोन ब्लॉकेज काढण्यात यश मिळविले.
कोणत्याही आजाराचा रुग्ण आला तरी त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान स्वीकारावे आणि आपले वैद्यकीय कौशल्या वापरून त्या रुग्णाला बरे करायचे हेच ध्येय असणार आहे.
डॉ हिबू जाधव, अधीक्षक
रुग्णालयात प्रधानमंत्री आयुष्ममान योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ मिळत असल्याने सर्व मोफत लाभ देण्याचा प्रयत्न आहे.
डॉ नंदकुमार तासगावकर, रुग्णालाय प्रमुख