आदेश खेडकर जिल्ह्यात प्रथम

। हमरापूर । प्रतिनिधी ।

पेण येथील सुमतीबाई देव प्राथमिक विद्यालयाचा इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱा विद्यार्थी आदेश अंबादास खेडकर याने मंथन परीक्षेमध्ये रायगड जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तसेच, कोकण विभागात दुसरा तर राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सहावा आला आहे.

आदेशने इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश संपादन केले असून त्यामध्ये गणित संबोध परीक्षा व गणित प्राविण्य परीक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, जवाहर नवोदय परीक्षेत सुद्धा आदेशची निवड झाली आहे. आदेशचे आई वडील प्राथमिक शिक्षक असून आदेशच्या या यशामागे त्याचे आई-वडील व शिक्षकांचा महत्वाचा वाटा आहे. तर, पडळकर व रत्नाकर पाटील या शिक्षकांनी देखील आदेशसाठी खूप मोठी मेहनत घेतली आहे. या यशाबद्दल आदेशचे पेण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे, केंद्रप्रमुख रामकृष्ण भोईर व शाळेचे संचालक मंडळ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version