घरीच अभ्यास करून शाळेत प्रथम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वडील पॅरालीसीसने अंथरुणाला खिळलेले, घरात कमावती आई अशा आर्थिक बेताची परिस्थिती असूनही कोणत्याही खाजगी शिकवणीला न जाता आपल्या बुध्दीच्या जोरावर आणि शाळेत शिक्षकांच्या शिक्षणावर भर देऊन के ई एस इंग्लिश मिडीयम स्कूल रेवदंडा शाळेची विद्यार्थिनी स्वरा संजय भोस्तेकर हिने दहावीत 88.60 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तिच्या यशात आई, वडील, शिक्षक आणि स्वतः स्वराचा मोठा वाटा आहे. स्वरा हिला इंग्रजी 86, मराठी 90, हिंदी 93, गणित 86, सायन्स आणि टेक्नॉलॉजी 86, सामाजिक शास्त्र 88 असे एकूण 500 पैकी 443 गुण पडले आहेत.

वडिल हे अंथरुणाला खिळले असून आई कामावर जात असल्याने स्वरा हिने याही परिस्थितीत खंबीरपणे आणि एकाग्रतेने अभ्यास करून आपले ध्येय गाठले आहे. वडिलांचे आजारपण काढत वेळेचे सदुपयोग करून स्वरा हिने यश संपादन केले आहे. तिच्या यशामुळे सर्व स्तरातून स्वराचे अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version