| मुंबई | प्रतिनिधी |
काँग्रेसने गुरुवारी सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर शुक्रवारी (दि. 22) शरद पवार गटाकडून संभाव्य नऊ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज्यभरात चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडली आहे. महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल. दरम्यान, या यादीमध्ये बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे.
बारामतीत ठरल्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे, माढ्यातून महादेव जानकर, सातार्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमदेवार असतील. तर शिरुरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.