फोटो सर्कलचे छायाचित्र प्रदर्शन
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
फोटो सर्कल सोसायटीतर्फे 24 व्या एफसीएस ग्रँड राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन आविष्कार -2023 चे पारितोषिक वितरण व प्रदर्शनाचे उदघाटन महापौर, नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. आविष्कार -2023 च्या फोटोस्पर्धेत ऐतिहासिक गडकिल्ले या विषयात सुधीर नाझरे याना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तर सौरभ नाझरे याला वेडिंग विख्यात प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. प्रदर्शनात समीर मोहिते,किरण तांबट, महेश आंब्रे, निखिल पांचाळ, राकेश रावळ, अंकुर तांबे, गणेश मेमाणे आदी मान्यवरांचे फोटो लावण्यात आले आहेत. छायाचित्रकारांनी काढलेली काही कलात्मक छायाचित्रे या प्रदर्शनात मांडली आहेत. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार शिरीष कराळे, ॲड. माधवी नाईक फोटो सर्कल सोसायटीच्या विधी सल्लागार, प्रवीण देशपांडे, संदीप लेले, संजीव नाईक उपस्थित होते.