समुद्रकिनाऱ्यावर मच्छीमारांची लगबग

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील एकदरा, राजपुरी, आगरदांडा, बोर्ली, कोर्लई या परिसरातील मासेमारी बोटी समुद्रात मासेमारी करिता जाण्यास सुरुवात केली आहे. त्या आधी सकाळी बोटीत महिन्यांभरचं कडधान्य, बर्फ, पुरेशी औषध, पिण्याचे पाणी आदिंसह सामान भरण्यासाठी मासेमारी कोळी बांधवांची लगबग सुरू झाली आहे.

शासनाने 1 ऑगस्टपासून समुद्रात जाण्यास व मासेमारी करण्यात मान्यता दिल्यापासून समुद्रात तीन वेळा वादळ आल्याने मासेमारी कोळी बांधवांचं खुप मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. आता वादळ पूर्णतः शांत झाल्याने मच्छिमार बांधव नव्या उत्साहात दर्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला आहे. मुरूड तालुक्यासह शहरातील हजारो कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून असतात. पावासाळ्यात संपुर्ण मासेमारी बंद होती. बंदी उठल्या नंतर मासेमारी करणारे कोळी बांधव समुद्रात मासेमारी करिता सज्ज होता, परंतु दोन दिवसांतच दोनदा वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने पुन्हा बोटी किनाऱ्यावर लावल्या गेल्या. एका बोटीत साधारण 10 खलाशी व एक नाखवा असतो. त्यांचा पगार अंगावर पडल्याने नाखवाना म्हणजेच बोट मालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.आता हवामान चांगले आहे. त्यामुळे मासेमारी बोटी समुद्रात जाण्यास तयार झाल्या आहेत.

Exit mobile version