| आगरदांडा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याला सुमारे 175 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असल्याने हा जिल्हा सागरी सुरक्षिततेच्यादृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. त्याकरिता सागरी सुरक्षा महत्त्वाची आहे. भारतीय नौदल सेना, कोस्ट गार्ड, पोलीस विभाग, मत्स्य विभाग हे समुद्रात गस्त घालत असले तरी मच्छिमार बांधव हेच समुद्राचे रक्षक असून, ते पोलिसांचे कान, डोळे आहेत, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी केले. मुरुड माळी समाज हॉल येथे भारतीय नौदल सेना मुंबई मच्छिमार समुदाय, सागरी रक्षक दल, ग्राम रक्षक दल, पोलीस पाटील यांच्यासोबत संवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी कमांडर नेव्ही मुंबई अंकेश बुंदेला, कमांडर सौजन्या, बंदर निरीक्षक राजपुरी सतीश देशमुख, खोरा बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ, कंमाडर आसिफ मुल्ला, कमांडर गौरव, कमांडर सुक्षमंम, कमांडर अच्युत, नेव्ही पोलीस शुभम पाटील, रेवदंडा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड, पोलीस नाईक सागर रसाळ, सेल्स ऑफिसर वाहन टोयटा अमोल कोलेकर, आकाश सोनावणे, अतुल पाटील, दीपक मोरे, कस्टम ऑफिसर अविनाश रंजन आदींसह पोलीस कर्मचारी, सागर रक्षक, मच्छिमार कोळी बांधव, पोलीस पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कमांडर असिफ मुल्ला मच्छिमार कोळी बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मासेमारी करताना सर्व प्रकारच्या काळजी घेणे आवश्यक आहे. संकट सूचना, ट्रान्समीटर, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, टॉर्च, इतर आवश्यक सागरी सुरक्षा उपकरणे घेऊन जावे, तसेच वैध कागदपत्रे बाळगणे व बायोमेट्रिक कार्डचे महत्त्व सांगितले. खराब हवामानात खबरदारी घेण्याचा आणि मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानात समुद्रातील आपत्कालीन परिस्थितीत अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला यावेळी मुल्ला यांनी यावेळी दिला.
नौदल सेनेचे पोलीस शुभम पाटील म्हणाले की, तरुण विद्यार्थ्यांनी भारतीय नौदल सेनेमध्ये येऊन भारताचे संरक्षणकर्ते बना. याकरिता गेळपळपवळरपपर्रीूं.लेा या वेबसाईडवर नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी सर्वप्रकारची माहिती मिळेल. तरी यांची माहिती घेऊन तरुण विद्यार्थ्यांनी भारतीय नौदल सेनेत भर व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भवानी मच्छिमार सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश पाटील, महेंद्र गार्डी, जागन वाघरे यांनी समुद्रात होणार्या अन्यायाबाबत पाढा वाचला. यावेळी भारतीय नौदल सेनेचे कमांडर यांनी मत्स्य विभागाचे अधिकारी नसल्याने समस्यांवर तोडगा निघाला नाही.परंतु, आमच्याकडून जे सहकार्य करता येईल, तेवढे आम्ही करु, असे आश्वासन कोळी मच्छिमार बांधवांना देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस नाईक सागर रसाळ यांनी केले.