मत्स्य तलाव धारकांची कार्यशाळा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मत्स्य तलावांची नोंदणी करणे आणि आणि तलाव धारकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे या एकमेकाशी संलग्न असल्याने शहापूर येथे जिताडा व्हिलेज मधील मत्स्य तलाव धारकांची कार्यशाळा संपन्न झाली.अतुल साठे यांनी मत्स्य तलावात कोणतीही प्रतिजैविके वापरू नये कारण त्याचा वापर ज्या तलावात होतो, ते मासे आपण खाल्यास हाडाचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे असा धोक्याचा इशारा या कार्यशाळेत देण्यात आला. मंगला पाटील यांनी तलावाची नोंदणी कशी करावी याची माहिती दिली. त्याच बरोबर तलावाच्या नोंदी केल्याने शासकीय मत्स्यबीज व हेचरीसाठी अर्थसहाय्य मिळू शकते. त्याच बरोबर इथला वेगळ्या चवीचा मासा जिताडा असून तो निर्यात करण्यासाठी तलावांचे गुगल लोकेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहापूर येथे या नोंदीचा प्रथमता पथदर्शी प्रकल्प राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


बँक ऑफ बडोदाच्या शाखाधिकारी श्‍वेता बनसोडे यांनी आपल्या गावातील तलावाच्या नोंदी लवकर झाल्यास शेतकर्‍यांना अर्थ सहाय्य करणे सोपे जाईल असे सांगितले. त्यावरून या संस्थेने या बाबत तातडीने हि कार्यशाळा आयोजित केली असे नमूद केले. तर सुधीर पाटील , मत्स्य तलाव धारक शहापूर यांनी चांगल्या गुणवत्तेचे मत्स्यबीज मिळाले पाहिजे, मत्स्य तलाव पर्यंत पोहोच रस्ते होणे आवश्यक आहे. जिताडा खारेपाट मानांकन होणे गरजेचे आहे. मत्स्य हॅचरी होणे गरजेचे आहे. अशा सूचना केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहन पाटील यांनी तर ग्रामस्थ व ग्राम पंचायत शहापूर यांच्या वतीने श्री. नंदन श्रीधर पाटील यांनी आभार मानले.

Exit mobile version