माहीमच्या समुद्रात पाच मुले बुडाली

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई माहिम येथील समुद्रकिनारी फिरायला आलेली पाच मुले बुडाल्याची घटना सोमवारी (दि.25) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील चार जणांना वाचवण्यात यश आले असून दोघांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील हर्ष किंजले या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. तसेच, एक तरुण अद्याप बेपत्‍ता आहे. त्‍याचे नाव यश कागडा असे असून त्याचा शोध सुरु आहे. माहीम पोलीस, अग्निशामक दलाचे पथक, सागरी पोलीस आणि स्वयंसेवक पुढील तपास करीत आहे.

Exit mobile version