| महाड | प्रतिनिधी |
महाड- दापोली राज्य मार्गावर शिरगाव गावच्या हद्दीत कार व रिक्षा यांच्यात अवघड वळणावर झालेल्या अपघातात कारमधील तीन व रिक्षातून प्रवास करणारे दोन प्रवासी जखमी झाले असून, जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाड- दापोली राज्य मार्गावरून कार दापोलीकडून महाडकडे येत होती. त्याचवेळी महाड कडून आंबिवली गावाकडे रिक्षा जात असताना अवघड वळणावर समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये कार व रिक्षा रस्त्याच्या बाजूला गेल्याने या रिक्षामधून प्रवास करणारे मनीष वाजे, रुचिता गायकर तर कारमधील अमोल पवार, रमेश पवार, नागेंद्र प्रसाद असे एकूण पाच प्रवासी जखमी झाल. या जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.







