जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 18 मे रोजी माणगाव तालुक्यातील दोन नवीन रुग्णांसह पनवेल मनपा हद्दीत तीन असे कोरोनाच्या पाच नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 81 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
बुधवारी पनवेल मनपा हद्दीत तीन तर माणगाव तालुक्यातील दोन नवीन रूग्ण आढळले तर पनवेल मनपा हद्दीत चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 430 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 651 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर थांबला आहे. सद्यस्थितीत 81 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.