शुक्रवारी पाच नामनिर्देशनपत्र दाखल

| रायगड | प्रतिनिधी |

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि.22 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी कर्जत, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात तीन उमेदवारांचे पाच नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

दरम्यान, 189-कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये सुधाकर परशुराम घारे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. 190-उरण विधानसभा मतदार संघामध्ये श्रीकन्या तेजस डाकी (अपक्ष) यांनी, 193-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये आदिती सुनिल तटकरे, (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) यांनी तीन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरु असून, दि.29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या सर्व अर्जाची दि.30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येणार असून दि.4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. मतदान दि.20 नोव्हेंबरला होत असून, दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version