माजी नौदल अधिकार्‍याने केला पाच महिलांवर बलात्कार

। मुंबई । वृत्तसंस्था ।
टिंडर या डेटिंग अ‍ॅपवर एका पुरुषाने एक-दोन नव्हे, तर तब्बल 5 महिलांवर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आधी हा नराधम डेटिंग अ‍ॅपवर महिलांशी ओळख वाढवायचा. चॅटिंग करुन त्यांच्याशी मैत्री करायचा. त्यानंतर हळूहळू गोड बोलून त्यांच्यावर गारुड घालायचा. अखेर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. ब्रिटनमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी नौदलाचा माजी अधिकारी आहे. या नराधमाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पाच जणींपैकी तिघी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याची माहिती आहे. ब्रिटीश कोर्टाकडून आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टानेही टॉम रॉडवेल यां 31 वर्षीय आरोपीचं वर्णन हैवान या शब्दात केलं आहे. एका पीडितेने सांगितले की, रॉडवेलच्या चेहर्‍यावर टॅटू आहेत. त्याला पाहून जणू राक्षस-हैवानांचाच भास होतो. तर एक पीडिता म्हणाली की, ‘मला वाटलं होतं तो मला जीवानिशी मारुन टाकेल, कारण त्याने कोणाला तरी ठार मारलं होतं.

Exit mobile version