पनवेल रेल्वे स्टेशनवर पाच वर्षांची मुलगी सापडली

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल रेल्वे स्थानकावर पाच वर्षांची मुलगी जोया बिंदू सादिक ही रेल्वे प्रवासी साहिल वीरन लाड यांना विना पालकाशिवाय भटकत असताना आढळली. त्यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना कळवून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले आहे. मुलीची उंची तीन फूट एक इंच असून, रंग सावळा, अंग सडपातळ, केस काळे, नाक सरळ व चेहरा उभट आहे. अंगात तिने पिवळ्या रंगाचा फुलबाह्यांचा डिझाईनचा शर्ट व पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट घातली आहे. पनवेल रेल्वे पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून मुलीला संरक्षणकामे पंचवटी, पनवेल खांदा कॉलनी येथे सुरक्षित ठेवले आहे. या मुलीच्या पालकांबद्दल किंवा नातेवाईकांबद्दल काही माहिती असल्यास मपोहवा सना आयाज घाटकरी मो. 9702786459 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version