कोकण भवन येथे ध्वजारोहण

| नवी मुंबइ | प्रतिनिधी |

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन गुरूवारी कोकण भवन येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त पी. वेलरासू यांच्या हस्ते कोकण भवन प्रांगणात सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आ. मंदाताई म्हात्रे, अपर आयुक्त कोकण विभाग विकास पानसरे, उपायुक्त विवेक गायकवाड, संजीव पालांडे, अमोल यादव, रेवती गायकर, गिरीश भालेराव, मिनल कुटे, प्रमोद केंभवी, अनिल टाकसाळे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, माजी सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version