। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जेएसएमच्या एनसीसी युनिटतर्फे रविवारी (1 मे) महाराष्ट्र स्थापना दिन साजरा केला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावला. सोबत सर्वांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायले. या कार्यक्रमात परेड कमांडरची भूमिका जिगर भगत यांनी निभावली. 15 कॅडेट्सनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप पाटील यांनी केले. नेतृत्व व दिग्दर्शन गणज संस्कार मोकल यांनी केले. गणज किरण पाटील, आदित्य पाटील आणि सोहम नागवेकर यांनी मांडणी करताना सहकार्य केले. तोसिफ अन्सारी, सीडीटी मिलिंद पाटील आणि सी.डी.टी कार्यक्रमाच्या संचालनासाठी पवन पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.