व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान
| कोलाड | प्रतिनिधी |
संततधार पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेवाडी बाजारपेठेत तसेच रोह्याकडे जाणाऱ्या द.ग. तटकरे चौकात पाणीच पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात शिरूर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच यामधून मार्ग काढताना वाहचालकांसहित प्रवासी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याला जबाबदार संबंधित ठेकेदार असल्याचे बोलले जात आहे. गणेशोत्सव आठ दिवसांवर आला असून, यामुळे आंबेवाडी येथील व्यापारी वर्गाने आपल्या दुकानात माल भरून ठेवला आहे. परंतु, दोन दिवस सतत पडत असलेल्या तुफान पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पुराचे पाणी दुकानात शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
