पूरग्रस्तांना अंतरवस्त्राची गरज

महाड | प्रतिनिधी |

महाड मध्ये आलेल्या महाप्रलायामुळे अतिशय गंभीर परिस्थिती बनली असून सुमारे २० ते २५ फूट पूराचे पाणी घरात म्हणजे दुसरा माळ्या पर्यंत पाणी शिरले होते, हजारो कुटूबं, तेवढ्याच दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे कोणाच्याही अंगावरच्या कपड्या शिवाय काहीही शिल्लक राहीले नाही सर्व काही गंभीर आहे तळीये गावावर तर दुःखाचा डोगंर कोसळला आहे शेकडो लोक गाडले गेले आहेत.
महाड शहरात ज्या संस्था मदत करित आहेत ते पाणी, धान्य, कपडे याची देत आहेत याची गरज आहे पण अंतरवस्त्राची गरज आहे कोणताही संकोच न करता या मदतीचेही वाटप करावे असे आवाहन महाडकरांच्या वतीने पत्रकार मनोज खांबे यांनी केले आहे.. महाड शहरात पंचनाम्या आधीच रक्कम शासनाने पूरग्रस्तांना द्यावी. तसेच महाड मध्ये लाईट लवकर येणे गरजेचे असून लोकप्रतिनिधी व शासनाने त्वरित त्या साठी प्रयत्न करावे तरच लोकांना पाणी उपलब्द होईल. याच प्रमाणे महिलांच्या संस्थांनी सॅनिटरी नॅपकिन, हगिज याचाही पुरवठा करण्याची गरज आहे

Exit mobile version