| अलिबाग | प्रतिनिधी |
शहापूर पूर्व भागामध्ये आणखी 14 ठिकाणी बांध फुटलेले असून तेथून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वेगाने येत आहे. फुटलेल्या बांधापर्यत सरकारी अधिकारी जाऊ शकत नसल्याने ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात जाऊन फोटो काढले आहे. 2019 साली फुटलेले खार बंधारे तात्काळ पंचनामा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कायम स्वरूपी ड्रोन कॅमेरा घेऊन सर्वेक्षण करावे अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने यापूर्वी केलेली आहे.
मुख्य बांध पक्के करण्यासाठी त्यावर मटेरियल पोचवण्यासाठी पोहोच रस्त्याची मागणी गेले वर्ष भर चालू आहे. यामध्ये कवळ बैठका होत आहेत. जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार यांच्याकडून यांच्या कडून आश्वासना पलीकडे काही न झाल्याने हा प्रसंग 22 घरातील 110 कुटुंबावर ओढावला आहे. 100 हून जास्त तलावातील मासे वाहून गेले आहे. तलावांच्या नोंदी महसूल खात्याने घातल्या नसल्याने त्यांना नुकसान भरपाई देखील मिळणार नाही.
12 जुलै रोजी 2022 रोजी खारभूमी उपअभियंता पाडीलकर यांनी शहापूर येथील धरमतर बाजुची 50 मी धोकादायक खांड नंदन पाटील,अनिल पाटील,.मितेश पाटील यांच्या उपस्थित जाऊन बघितली. त्याच बरोबर पोहोच रस्त्याची आवश्यकता देखील समजावून घेतली. पण आता परिस्थिती हाता बाहेर गेलेली आहे. तलावातील मासे वाचवण्यासाठी काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला होड्या लावून ठेवल्या आहेत व स्व:ताची आपत्ती निवारण व्यवस्था तयार केली आहे.दरम्यान या उधाणात दयानंद पाटील यांच्या घराच्या पायात व भिंतीत पाणी शोषण झाल्याने घरांचे आयुष्य कमी होणार आहे,प्रदीप पाटील यांची भात पेरणी व रोपे कुजून गेली.
प्रत्येक उधाणास पंचनामे होतात त्या वर कोणतीही कार्यवाही होत नाही. सरखेला काह्नोजी आंग्रे आणि आमच्या पूर्वजानी मातीपासून शेती केली त्याच शेतीची आता माती व्हायची वेळ आली आहे.
आत्माराम पाटील,शेतकरी शहापूर