| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात पशुपालकांसाठी पौष्टिक चाऱ्याचा नवा पर्याय म्हणून सुरभी सीएसआर प्रकल्पाअंतर्गत अझोला चारा उत्पादनाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. तालुक्यातील पशूपालक शेतकऱ्यांच्या पशूधन आरोग्य व उत्पन्नवाढीच्या दृष्टीने दीपक फाऊंडेशन व दीपक नायट्रेट लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सुरभी’ या सीएसआर प्रकल्पाअंतर्गत आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत सुमारे 80 पशुपालक शेतकऱ्यांसाठी अझोला चारा उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. दीपक फाऊंडेशन व दीपक नायट्रेट लिमिटेड यांच्या या पुढाकारामुळे रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना शाश्वत पशुपालनासाठी नवे तंत्रज्ञान व चारा व्यवस्थापनाचे पर्याय उपलब्ध होणार असून, पशुधन व शेतकरी दोघांचेही आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित होण्यास हातभार लागणार असल्याचे दीपक फाऊंडेशनचे अनिकेत निकम यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला अधिक माहिती देताना सांगितले.







