| पनवेल । वार्ताहर ।
गणेशोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्तभागवत सोनावणे यांनी केले. ते खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी व सागरी सुरक्षा दलाच्या बैठकीत बोलत होते.या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, महिला पोलिस निरीक्षक विमल बिडवे आदी उपस्थित होते. गणेशोत्सव साजरा करताना मंडप आणि बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, तसेच आस्थापनांकडून योग्य त्या परवानगी घेऊनच उत्सव साजरा करण्याच्या सूचना खारघरमधील गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांना करण्यात आल्या.गणेशमूर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणूक विहित वेळेत सुरू करून विहित वेळेत संपवाव्यात. कोणताही अनुचित प्रकार अथवा बेवारस वस्तू व व्यक्तीच्या संशयित हालचाली निदर्शनास आल्यास तत्काळ संपर्क साधण्याच्या सूचना देखील पोलिसांनी केल्या आहेत.