चिल्हे शाळेत भरला खाऊ बाजार

| खांब | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील रा.जि.परिषद शाळा चिल्हे येथील चिमुकल्यांनी शाळेमध्ये एकदिवसीय खाऊ बाजार भरवून व्यवहार ज्ञान आत्मसात केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने आणि विद्यार्थीवर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांसाठी हळदीकुंकू तसेच शाळेत बालआनंद बाजार म्हणून खाऊ गल्ली तयार करून त्यात छोटी-छोटी दुकाने थाटली. तसेच विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवून एक उत्तम व्यवहारातील उपक्रम म्हणून विद्यार्थी वर्गासाठी विक्रीस मांडले होते. तर तयार केलेल्या चविष्ट पदार्थांचा उत्तम आस्वाद विदयार्थी वर्गाने तसेच पालक, शिक्षक व उपस्थितीत ग्रामस्थ व महिलांनी घेतला. तर येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अनोख्या उपक्रमाचे साऱ्याने कौतुक केले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा अशोक गायकवाड, शरद पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र महाडिक, मेघना महाडिक तसेच इयत्ता 1 ली ते 4 थी च्या सर्व विद्यार्थ्यांनी खाऊ बाजार उपक्रमात आवडीने सहभाग घेतला. खाऊ बाजार गल्लीत विविध प्रकारच्या खाऊंचा स्वाद साऱ्या उपस्थित महिलांनी घेतला. तसेच उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या आर्थिक उलाढालीतील मदत व त्यातून त्यांची बुद्धिमत्ता आणि गणिताचे ज्ञान वाढण्यास मदत झाली आणि त्यातून एक व्यवाहारी ज्ञान आत्मसात केले असल्याचे पालकवर्गातून बोलले जात आहे.

Exit mobile version