सुकी मच्छी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

। तळा । प्रतिनिधी ।

पावसाळ्यात सुकी मच्छी खायला मिळत नसल्याने पावसाळ्यापूर्वी खवय्यांचा सुकी मच्छी खरेदी करण्याकडे कल वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या महिला वर्ग अघोटीचे पावसाळ्यासाठी साठवणूक करण्यात गुतंले असून पापड, मसाले, गहू, तांदूळ, कडधान्ये या बरोबर सुकी मच्छी भरण्यासाठी दुकानात गर्दी केली आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी सुकी मच्छी साठवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रजनन काळात ओल्या मच्छीला बंदी असते अशावेळी सुक्या मच्छीला अधिक पसंती देतात. त्यामुळे सुकट, मांदेली, बारीक जवळा, अंबाडी, वाकटी सफेद व काळी, माकली, ढोमकी, बोंबील, बांगडा यांची मागणी वाढली असून ही सर्व सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.

Exit mobile version