सोलनपाडा पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी सव्वा तीन कोटींची तरतूद

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या जामरुंग येथे असलेल्या सोलनपाडा पाझर तलावाची दुरुस्ती करण्याचे कामासाठी राज्याच्या जलसंधारण विभागाने सव्वा तीन कोटींची तरतूद केली आहे.कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आ. महेंद्र थोरवे यांनी जलसंधारण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि त्यामुळे या पाझर तलावाची दुरुस्ती मुख्यंमत्री जलसंवर्धन योजनेमधून केली जात आहे.
कर्जत हा भातशेतीचे कोठार समजल्या जाणार्‍या जिल्ह्यातील तालुका.त्या तालुक्यात फार्म हाऊस संस्कृती येण्याआधी सर्वत्र शेती केली जायची.शेतीचे क्षेत्र लक्षात घेऊन कर्जत तालुक्यात 1980 च्या दशकात पाझर तलाव बांधण्यात आले होते.कर्जत तालुक्यात असलेल्या पाझर तलावांची पाणी साठवण करून ठेवण्याची क्षमता हि दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कारण तालुक्यातील खांडस आणि कशेळे येथील पाझर तलाव यात मोठ्या प्रमाणात माती आणि दगड हे पाझर तलावात येऊन साचले आहेत. त्यामुळे या दोन्ही पाझर तलाव च्या पाण्यावर भाताची शेती उन्हाळ्यात केली जात नाही.
मात्र अन्य चारही पाझर तलावाच्या पाण्यावर दुबार शेती केली जात आहे.तर त्याच भागातील जामरुंग येथे असलेल्या सोलनपाडा येथील पाझर तलावाच्या पाण्यावर करीत असून तेथे देखील स्थानिक शेतकरी हे रोपे तयार करणारी नर्सरी करीत असतात. त्याच जामरुंग येथील पाझर तलावाची दुरुस्ती सहा वर्षांपूर्वी तब्बल पाच कोटी रुपये इतका निधी खर्च करून केली होती.
या ठिकाणी पावसाळ्यात सांडव्यामधून जाणारे पाणी हे उन्हाळ्यात देखील त्या काँक्रीट च्या कामाला गळती लागल्याने वाहत असते. परिणामी शेतीची कामे आणि या पाझर तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना यांना पाण्याचा तुटवडा जाणवत असतो.
यावेळी धरणातील पाण्याचंबी सुरु असलेली गळती वाढल्यास धरण फुटण्याची अधिक भीती असते हे लक्षात घेऊन स्थानिक गावकर्‍यांनी लघु पाटबंधारे यांनी धरण फुटण्याची भीती व्यक्त केली होती.त्यामुले स्थानिक आमदार थोरवे यांनी राज्याच्या जलसंधारण विभागाकडे दुरुस्तीच्या कामासाठी पाठपुरावा केला होता.त्यानुसार मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून आता जामरुंग पाझर तलावाचे दुरुस्ती केली जाणार आहे.

Exit mobile version