हिंदू धर्मियांकडून पोलिसात रवानगी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ परिसरात गेल्या काही दिवसार ख्रिश्चन मिशनरी यांच्याकडून विविध मार्गांनी धर्मांतर करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. शनिवारी सकाळी धामोते परिसरात आठ तरुण- तरुणींकडून स्थानिकांच्या घरी जाऊन येशू बद्दल माहिती देऊन हेच तुम्हाला संकटातून बाहेर काढू शकतात असे सांगितले जात होते.
त्याबाबत स्थानिक हिंदु लोकांनी जागरूकता दाखवत ख्रिश्चन मिशनरी यांचा प्रचार उधळून लावला. दरम्यान, या बाबत नेरळ पोलिसांनी सार्वजनिक कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्या सर्वांवर कारवाई केली असून, हिंदू समाज नेत्यांनी यावेळी असे पुन्हा घडू नये यासाठी जागरूकता दाखवण्याचे आवाहन केले.
याच महिन्यात कोल्हारे आदिवासीवाडीमध्ये धामोते भागात राहणाऱ्या ख्रिश्चन व्यक्तीकडून बळजबरी धर्मांतर केले जात असताना स्थानिक तरुणांनी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्या ठिकाणी पोहचलेल्या ख्रिचन मिशनऱ्यांना हाकलून लावले होते. ही घटना ताजी असताना शनिवारी (दि.27) सकाळी नऊ वाजता अंबरनाथ येथील आठ तरुण- तरुणींनी नेरळ साई मंदिर परिसरात येशू ख्रिस्त यांच्याबद्दल माहिती देण्यास आणि ख्रिचन धर्म किती चांगला आहे, त्या वाटेने गेल्यास किती मदत होऊ शकते अशा अनेक प्रकारची माहिती देऊन प्रलोभने दाखवली जात होती. आठ जणांची तुकडी वेगवगेळे गट करून माहिती देण्याचे आणि प्रसार प्रचार करण्याचे काम करीत होती. त्यावेळी काही सुशिक्षित असलेले हिंदू तरुण यांना त्या ख्रिश्चन मिशनरी यांचा हेतू लक्षात आला. ख्रिचन मिशनरी यांच्याकडून दाखवण्यात येत असलेली जे डॉट ओआरजी ही वेब साईट तरुणांनी सर्च केली असता हा सरळ सरळ हिंदू धर्मियांना ख्रिचन धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे लक्षात आले. त्यानंतर साई मंदिर नाका येथे असंख्य तरुण जमले आणि त्यांनी त्या ख्रिचन धर्म प्रचारक यांना एकत्र येत तुम्ही काय करता? असे विचारल्यावर आणि त्यांची आधारकार्ड तपासल्यावर हे ख्रिचन प्रसारक असल्याचे लक्षात आले.
या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नेरळ पोलीस साई मंदिर येथे पोहचले आणि त्यांनी जमाव संतप्त होण्याआधी आठ तरुण-तरुणी यांना नेरळ पोलीस ठाणे येथे आणले. प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी वरिष्ठ अधिकारी पोलीस उप अधिक्षक राहुल गायकवाड यांच्यासोबत चर्चा करून सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे कार्य करीत असलेल्या ख्रिचन धर्म प्रसारक यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी नेरळ परिसर फिरत असलेल्या त्या आठ जणांमध्ये तीन महिला आणि पाच पुरुष होते. त्या सर्वांनी मागील काही वर्षात ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याचे आढळून आले आहे. तर त्या पाच तरुणांमध्ये एक तरुण 17 वर्षाचा होता आणि तो देखील धर्म प्रसारक म्हणून घरोघरी फिरत होता.
प्रलोभनाना बळी
अंबरनाथ येथील आठ तरुण तरुणींनी नेरळ साई मंदिर परिसरात येशू ख्रिस्त यांच्याबद्दल माहिती देण्यास आणि ख्रिचन धर्म किती चांगला आहे, त्या वाटेने गेल्यास किती मदत होऊ शकते अशा अनेक प्रकारची माहिती देऊन प्रलोभने दाखवली जात होती. आठ जणांची तुकडी वेगवगेळे गट करून माहिती देण्याचे आणि प्रसार प्रचार करण्याचे काम करीत होती.







