। रेवदंडा । वार्ताहर ।
वळके येथे रात्रीच्या सुमारास घरात शिरून महिलेस चाकूचा दाखवून रोख रक्कमेची जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून वळके येथील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मुरूड तालुक्यातील वळके येथील पुष्पा सुभाष पाटील (45) यांच्या रहात्या घरात बुधवारी (दि. 23) रात्री साडेअकराच्या सुमारास वळके येथील प्रमोद सखाराम काटकर (34) यांनी घराच्या वरच्या मजल्यावर चढून घरातील जिन्यावाटे घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात एकटीच झोपलेल्या पुष्पा पाटील यांना हातातील चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी कपाटात ठेवलेले 7300 रूपये रोख रक्कम घेऊन पळून गेले. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.