विना परवाना इंजायली किटा वाहतुक करणारे वाहन जप्त
| कोलाड | कल्पेश पवार |
मुंबई गोवा महामार्गावर मौजे तपासणी नाका, कोलाड येथ शुक्रवारी (दि.23) पहाटे 03.55 च्या सुमारास वनविभागाने विना परवाना इंजायली किटा वाहतुक करणारे वाहन जप्त केली असून या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मा.उप वनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व मा. सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज तुकाराम वाघमारे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहा व अंगद भोसले वनरक्षक तपासणी नाका कोलाड, राजेश थळकर वनपाल कोलाड व स्टाफ, यांनी दि. 23 पहाटे 03.55 वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून मुंबई गोवा राज्यमार्ग क्र.66 वर कोलाड येथे आयशर (MH-08-AP-4783) ची तपासणी केली असता इंजायली किटा 25.740 घ.मी. किंमत 20257/- रु. व जप्त वाहन आयशर (MH-08-AP-4783) अंदाजे किंमत 15,75,000/- रु. विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला.
सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व इंजायली किटा असा एकूण एकंदर 15,95,257/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी गाडी चालक श्री सौरभ जयदास जाधव, दापोली, जि.रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.