भालिवडीत वनमजुराला मारहाण

वनपाल-वनरक्षक संघटना आक्रमक
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील वन विभागाच्या कर्जत पूर्व क्षेत्रात असलेल्या हुमगाव बिट मधील वन जमिनीवर सिमेंट बांधकाम करून भिंत बांधण्यात आली आहे. ती भिंत पाहण्यास गेलेल्या वन विभागाच्या कर्मचार्‍यांना वन जमिनीमध्ये सिमेंट बांधकाम करणार्‍या स्थानिकाने वन मजुरावर हल्ला केला. कर्जत तालुक्यात वन विभागाचे तीन परिक्षेत्र असून त्यातील हुमगाव परिक्षेत्रात पाच बिट आहेत. त्यातील भालिवडी बीटमधील आंबोट गावाचे रहिवाशी वन मजूर नाथा मसणे हे सावळे बीटचे वनरक्षक जी. आर. काकडे आणि हुमगांव बीटच्या वनरक्षक कल्याणी आव्हाळे यांच्यासह वन जमिनीमध्ये केलेले बांधकाम पाहायला गेले होते. त्यावेळी गौळवाडी संरक्षित वन 28/2 ब मध्ये सिमेंट बांधकाम करून दगडी बांधकाम केले जात असल्याचे वन कर्मचार्‍यांच्या नजरेस पडले. त्यावेळी वन संरक्षित जमिनीत बांधकाम करणारे भालेवाडी येथील राजेश उर्फ बापू वसंत कर्णूक यांनी त्या ठिकाणी असलेले बांधकाम 40 वर्षांपासून आहे असे सांगितले. मसणे हे गेली 30 वर्षे या भागात वन मजूर म्हणून काम करीत असून यांनी असे 30 वर्षे या ठिकाणी कोणतेही बांधकाम नव्हते आणि आताचे बांधकाम काही नजीकच्या काळातील असल्याची माहिती दिली.

त्यामुळे वनरक्षक कल्याणी आव्हाळे आणि जी आर काकडे यांनी गुन्हे काम करण्यास सुरुवात केली. संरक्षित वन जमिनीवर केलेले बांधकाम याच्यावर कारवाई होण्याची भीती निर्माण झाल्याने राजेश उर्फ बापू कर्णूक याने त्या ठिकाणी उभे असलेले वन मजूरला दगड टाकून ठेवलेल्या जमिनीवर ढकलले असता मसणे यांच्या डोक्याला मार लागला. तेवढ्यावर कर्णूक थांबले नाहीत तर त्यांनी धावत जाऊन लाकडी दांडके आणून मसणे जखमी केले. जखमी अवस्थेत असलेले मसणे यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या वन विभागाच्या वनमजुराला मारहाण केलेल्या प्रकरणाचा तपास करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपी यास तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य वनपाल -वनरक्षक संघटना यांनी केली आहे. संघटनेचे कार्यध्यक्ष सुनील कापसे यांनी माहिती दिली असून संघटनेचे सचिव एम डी तावडे यांनी आरोपीला अटक करून कायदेशीर करावी करावी या मागणीचे निवेदन देऊन मुख्य वन संरक्षक यांना केली आहे.

Exit mobile version