मतभेद विसरा,संघटना मजबूत करा- जोशी

| खोपोली | प्रतिनिधी |

आपापसातील अंतर्गत मतभेद विसरून पक्ष संघटना अधिक मजबूत करा,असे आवाहन शिवसेना ठाकरे गट जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी यांनी केले.खोपोलीतील प्रमुख महिला पदाधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख तथा शहर प्रमुख डॉ.सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. तर या बैठकी महिलांनी अनेक विषयांवर विचार विनिमय करून पुढील काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एक दिलाने काम करा असे एकमेकांना आश्वासन दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनिता पाटील, जैबुनिसा शेख, सुविधा विचारे, किशोरी शिगवण, भाग्यश्री चव्हाण, आदिती पवार, सुखदा बने, कविता पाटील, संगीता गुरव, सुलक्षणा दाभाडे, इंदू पाटील, सूर्यवंशी ताई रेश्मा रासकर, मन्सूरी ताई, संगीता पाटील, कीर्ती पाटील आदी प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थितीत होत्या.

डॉ.सुनील पाटील यांनी महिला पदाधिकाऱ्यांना संबोधताना म्हणाले की, आपल्या कामातून आपली ओळख निर्माण केल्यास प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पक्षश्रेष्ठी दखल घेत आपल्याला योग्य तो न्याय देण्याचे काम करतील, असे सुचित केले. अनिता पाटील यांनीही आपले विचार मांडले.

Exit mobile version