माजी आ. पंडित पाटील यांच्याकडून देशमुख कुटूंबाचे सांत्वन

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाड येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत यशवंत देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. पंडित पाटील यांनी महाड येथे जाऊन देशमुख कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेकाप तालुका चिटणीस गणेश सावंत, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक राजीव मोरे, सचिन चाळके आदी बँक कर्मचारी तसेच शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.

तांबडभूवन येथील श्रीकांत देशमुख यांचे गुरुवारी (दि.11) निधन झाले. महाड येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, नातेवाईक मित्रमंडळींनी उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली. शनिवार(दि. 20) जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संगमावर येथे दशक्रीया विधी होणार असून उत्तरकार्य 23 जानेवारी रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती देशमुख कुटूंबियांकडून देण्यात आली.

शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांना श्रीकांत देशमुख यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांनी शुक्रवारी 19 जानेवारी रोजी महाड येथे जाऊन देशमुख कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी संजीव देशमुख, नितीन देशमुख व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते.

Exit mobile version