अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अजित शहा यांचे निधन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष तथा कोएसोचे माजी कार्यवाह अजित पुरुषोत्तम शहा यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी 10 मार्च रोजी निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. स्व. अ‍ॅड. दत्ता पाटील यांचे निकटवर्तीय असणारे अजित शहा हे अलिबाग अर्बन बँकेचे अनेक वर्षे संचालक तसेच अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच जनता शिक्षण मंडळाचे माजी सेक्रेटरी, कोकण एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आदी महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, पुत्र, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजता अलिबागमधील रामनाथ स्मशानूभमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version