| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन झाले आहे. बुधवारी 31 जुलै रोजी त्यांचे निधन झाले. अंशुमन गायकवाड लंडनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून ब्लड कॅन्सवर उपचार घेत होते. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वी उपचारांसाठी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदतही केली होती. मात्र अखेर त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. ते 71 वर्षांचे होते. गायकवाड यांच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.





