पुणे येथील रुग्णालयात दाखल
| मुंबई | वृत्तसंस्था |
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये प्रतिभाताई यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांचं (वय 89) वर्ष आहे. 2007 ते 2012 या दरम्यान त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई यांची प्रकृती बरी नसल्याचे बोलले जात होते, (दि.13) बुधवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल केले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. प्रतिभाताई या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. नंतर त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत 20 वर्षे त्यांनी विविध खात्याची मंत्रीपदे सांभाळली आहेत.
