माजी रणजीपटूचे निधन

। मुंबई । प्रतिनिधी ।

माजी रणजीपटू सुरेश अनंत देवभक्त यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने विरारच्या आगाशी येथील राहत्या घरी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. सुरेश देवभक्त दोदू या नावाने प्रसिद्ध होते. वयाच्या 12 व्या वर्षापासून वसई तालुका क्रिकेटमध्ये खेळणार्‍या देवभक्त यांनी स्थानिक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केली होती. 1971 मध्ये त्यांनी रणजी करंडकमध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली रणजी सामना खेळला होता. त्यांनी अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजविल्या होत्या. नॅशनल क्रिकेट क्लब यंग मेन्स आणि नवरोझ क्रिकेट संघातर्फे खेळताना त्यांनी अनेक पराक्रम केले.

Exit mobile version