न्हावा शेवा माजी सरपंचांचे उपोषण सुरुच

मालकासाठी श्‍वानाने दिली साथ
| उरण | वार्ताहर |
विविध मागण्यांसाठी मागील तेरा दिवसांपासून नवीन शेवा गावचे माजी सरपंच निशांत घरत यांनी जेएनपीए विरोधात सुरू केलेल्या आमरण उपोषणावर चर्चेनंतर अद्यापही सकारात्मक तोडगा निघालेला नाही.मात्र प्रकृती खालावल्यानंतरही न्याय मिळेपर्यंत उपोषण सूरुच ठेवण्याचा निर्धार शनिवारी (2) उपोषणकर्ते निशांत घरत यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केला आहे.सदर उपोषणाची दखल प्रशासन घेत नसल्याने निशान घरत यांचा कुत्रा ही उपोषणाला बसल्याचे दिसत आहे.

शिवसेना, काँगेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शेकाप,आम आदमी पार्टी यांच्या पाठिंब्यावर नवीन शेवा गावचे माजी सरपंच निशांत घरत यांनी जेएनपीए व्यवस्थापना विरोधात विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाची दखल घेत जेएनपीएचे वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे,उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, न्हावा- शेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी उपोषणकर्ते निशांत घरत यांची भेट घेतली.यावेळी कामगार नेते दनेश पाटील, भूषण पाटील, रवींद्र पाटील, संतोष पवार, प्रमोद ठाकूर, राजेंद्र मढवी आदी उपस्थित होते.या भेटीत विविध मागण्यांवर चर्चा झाली.मात्र सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने आमरण उपोषण तेराव्या दिवशीही सुरूच आहे.

Exit mobile version