नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी चेअरमन प्रताप चौधरी यांना कर्ज घोटाळा प्रकरणी अटक झाली आहे. राजस्थानातील जैसलमेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रतीप चौधरी यांना त्यांच्या दिल्ली येथील घऱातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. जैसलमेरमधील एका हॉटेलसंदर्भातील खटल्यात त्यांचा समावेश आहे. गोडावन ग्रुपनं जैसलमेरमध्ये हॉटेल बांधण्यासाठी सन 2008 मध्ये 24 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.