वदप येथे किल्ले, रंगावली स्पर्धा उत्साहात

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील वदप येथील जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे दीपावलीनिमित्त किल्ले बनविण्याची आणि रांगोळी काढण्याची स्पर्धा आयोजित केली होती. रांगोळी आणि किल्ले स्पर्धेत वदप गावातील 35 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. किल्ले बांधणी स्पर्धा आणि रंगावली स्पर्धेचे परीक्षण प्रमुख पाहुणे शाहीर गणेश ताम्हाणे, अ‍ॅड. योगेश देशमुख यांनी केले.
रांगोळी स्पर्धेत प्रथम संचिता भोईर, द्वितीय मधुरा मुळे, तृतीय हर्षदा चव्हाण यांनी क्रमांक पटकावले. तर किल्ले बांधणी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्‍लोका येरुणकर, द्वितीय यश पाटील, तृतीय पार्श्‍व पाटील यांनी क्रमांक पटकावले. जय हनुमान सेवा मंडळाचे कार्यकर्ते नयनिश दळवी, श्याम शिंदे, विकास चव्हाण, प्रकाश चव्हाण, विकास पोटे, नितीन येरुणकर, रोहिदास येरुणकर, सचिन चव्हाण, संदीप चव्हाण, राहुल भोईर, अतुल पवार, गणेश पारठे, विजय चव्हाण, दिलीप लोखंडे, अमित शिंदे, ऋषिकेश पाटील, शरद काळे, वैभव मुळे, सौरभ भुरुक, सचिन मंडलिक, जितेंद्र भोपी यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रमुख आयोजक समीर येरुणकर यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल वदप ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Exit mobile version