राष्ट्रपतींचे प्रशंसोद्गार,शिवप्रभूंना त्रिवार वंदन
किल्ले रायगड | चंद्रकांत कोकणे | जुनेद तांबोळी |
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले रायगड हे तमाम भारतीयांसाठी तीर्थक्षेत्रच असल्याचे प्रशंसोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी(6 डिसेंबर) किल्ले रायगडावर काढले.
राष्ट्रपती कोविंद यांनी किल्ले रायगडला भेट देऊन शिवप्रभूंना विनम्र अभिवादन केले.यावेळी त्यांच्या पत्नी सविता कोविंद,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पालकमंत्री अदिती तटकरे, जि.प.अध्यक्षा योगिता पारधी, खा.सुनील तटकरे, खा.संभाजीराजे, आम. भरत गोगावले, आम.अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी यावेळी राजसदर,होळीचा माळ,जगदीश्वर मंदिर,आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट दिली.यावेळी त्यांनी छ.शिवाजी महारांजाच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन वेैले.
आपल्या अभिभाषणांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडाला भेट देणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा बाब आहे.आजच्या रायगड भेटीला मी तीर्थक्षेत्र मानतो, विसाव्या शतकामध्ये महात्मा गांधींनी स्थापन केलेले स्वराज्य हे छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराजां पासून प्रेरित होते, असे ते म्हणाले. किल्ले रायगडला भेट देण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी संभाजीराजांचे आभार मानले.
रोपवेमधूनच किल्ल्यावर
राष्ट्रपती कोविंद हे किल्ल्यावर हेलिकॉप्टरमधून येणार की रोप वे मधून याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.किल्ल्यावरील होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरविण्यास काही संघटनांनी विरोध दर्शविला होता.त्याचा आदर राखत राष्ट्रपतींनी रोपवेद्वारे किल्ल्यावर जाणे पसंत केले. राष्ट्रपतींचे दुपारी 12.15 वाजता पाचाड येथे आगमन झाले.
किल्ल्यावरच भोजन
राष्ट्रपती हे नियोजित दौर्याप्रमाणे दुपारी साडेबार ते दीड वाजेपर्यत थांबणार होते,परंतु राष्ट्रपती व त्यांच्या कुटूंबीयांची भोजन व्यवस्था गडावर करण्यांत आल्यामुळे चार वाजे पर्यत ते गडावरच थांबले होते.
विशेष बग्गीतून फेरफटका
राष्ट्रपती करीता गडावर त्यांच्या करीता विषेश बग्गीची व्यवस्था संयोजकां कडून करण्ंयात आली होती.या बग्गीचा वापर राष्ट्रपतीनी होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर या अंतरा मध्ये केला.त्यांनी यावेळी पुस्तक प्रदर्शनाला देखिल भेट दिली.तसेच दोन पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यांत आले.तसेच गडावर आधारीत माहिती पटाचे देखील प्रकाशन यावेळी करण्ंयात आले.
दौर्याच सर्वसामान्यांना फटका
राष्ट्रपती किल्ले रायगडावर येणार असल्याने पर्यटकांना बंदी घालण्यांत आली होती,तर रस्त्यावरील प्रवासी वाहने देखील रोखण्यांत आली होती.यामुळे दैनंदिन कामाकरिता येणार्या नागरिकांचे हाल तर झाले.शिवाय गैरसोय देखिल झाली.विद्यार्थाना देखील रोखण्यांत आले त्यामुळे मुले शाळेत जाऊ शकली नाहींत, मोलमजुरी करण्या साठी जाणार्या मजुरांना महिलांना देखिल रोखण्यांत आले तर पाचाड गावांमध्ये घराच्या बाहेर देखील पहाण्याला बंदी घालण्यांत आली होती त्यामुळे सर्व सामान्या जनतेला त्यांचे दर्शन देखील होऊ शकले नाही.