। पनवेल । वार्ताहर ।
फोर्टीफाईड तांदळाची खुल्या बाजारात विनापरवाना विक्री करताना आढळल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वेस्टर्न राइस मिल, कोल्हापूर, पिके मलगी अँग्रोटेक लिमिटेड कर्नाटक, श्री बंशाकरी अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या कंपनीमार्फत सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत असलेल्या फोर्टीफाईड तांदळाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. आष्टे लॉजिस्टिक कसळ खंडसमोरील ट्रक पार्किंगमध्ये पुरवठा विभाग आणि पनवेल तालुका पोलीस यांच्याकडून कारवाई करण्यात आली. यावेळी पाच वाहनांमध्ये 44 लाख 21 हजार 416 रुपयांचा एक हजार 600 क्विंटल तांदूळ (25 किलो बॅगप्रमाणे 6,400 बॅग) सापडल्या. 44 लाखांचा तांदूळ आणि 70 लाखांच्या पाच गाड्या कारवाईत जप्त केल्या आहेत.







